

Gold or Silver? Ratio Hits 76:1; Experts Reveal Where Investors Should Put Their Money
eSakal
Gold vs silver which is better investment right now: सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये सध्या मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशातच गोल्ड-सिल्व्हर रेशो म्हणजेच सोनं-चांदी गुणोत्तर सुमारे 76 वर पोहोचलं आहे. याचा अर्थ एक औंस सोनं खरेदी करण्यासाठी जवळपास 76 औंस चांदी लागते. या रेशोमध्ये वाढ होणं म्हणजे सोन्याच्या तुलनेत चांदी स्वस्त झाली आहे, असा संकेत मिळतो. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करावी की चांदीत, असा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर आहे.