‘एचडीएफसी’च्या शेअरचे काय?

सध्या एचडीएफसी बँकेचा शेअर चर्चेत आहे. विलीनीकरणानंतर हा शेअर सातत्याने घसरत आहे; मात्र इतर बॅंकांचे शेअर वाढत आहेत.
HDFC Bank
HDFC BankSakal

सध्या एचडीएफसी बँकेचा शेअर चर्चेत आहे. विलीनीकरणानंतर हा शेअर सातत्याने घसरत आहे; मात्र इतर बॅंकांचे शेअर वाढत आहेत. अशा वेळी आपण नेमके काय करावे, असा प्रश्‍न गुंतवणूकदारांना भेडसावत आहे. एचडीएफसी बॅंकेचे शेअर ठेवून द्यावे, की ते सर्व विकून वाढणारे स्टेट बँकेचे किंवा अन्य शेअर घ्यावेत?

कारण एचडीएफसी बॅँकेच्या शेअरमध्ये सुधारणा होऊन, तो वाढायला वर्ष ते दोन वर्षे लागण्याचा अंदाज आहे. तोपर्यंत इतर चांगले शेअर घेऊन जेव्हा एचडीएफसी बँकेचा शेअर वाढायला लागेल, तेव्हा पुन्हा तो घेता येईल, असा विचार सूज्ञ गुंतवणूकदारांच्या मनात येणे स्वाभाविक आहे.

विलीनीकरणापूर्वीची स्थिती

एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेचे विलीनीकरण एक जुलै २०२३ रोजी झाले. एचडीएफसी लि.च्या २५ शेअरच्या बदल्यात एचडीएफसी बँकेचे ४२ शेअर भागधारकांना मिळाले. बॅंकेला विलीनीकरणाचे अनेक फायदे मिळणार आहेत. परंतु, या व्यवहाराची व्याप्ती पाहाता, त्याला बराच काळ लागणार आहे. विलीनीकरणामुळे बॅंकेचे जागतिक ‘वेटेज’ कमी होणार होते. याची सूज्ञ गुंतवणूकदारांना जाणीव होती.

यावरून असे दिसून येईल, की शेअर बाजाराने विलीनीकरणाचे स्वागत केलेले नाही. एचडीएफसी बँकेचा शेअर खाली खालीच येत आहे आणि गृहकर्ज देण्याऱ्या कंपन्यांचे शेअर वाढत आहेत. इतर शेअर आणि शेअर बाजारही वाढत असताना एचडीएफसी बँकेचे शेअर पडत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत.

विलीनीकरणापूर्वी एचडीएफसी लि. आणि एचडीएफसी बँकेचे शेअर अनुक्रमे २,९२७ रुपये आणि १,७५८ रुपयांच्या उच्चांकावर गेले होते. विलीनीकरणानंतर एक जुलै २०२३ रोजी एचडीएफसी बँकेचा शेअर १,६५५ रुपयांवर उघडला होता.

घसरणीची कारणे

1) विलीनीकरणानंतर बॅंकेने नव्या शाखा उघडण्याचा सपाटा लावला. जवळ जवळ ३०० नव्या शाखा उघडल्या गेल्या. आणखी एक हजार शाखा उघडण्याचा विचार आहे. पुढील ३ ते ५ वर्षांत एकूण संख्या १३ हजारांपर्यंत नेण्यात येणार आहे. परंतु, नव्या शाखा नफ्यात येण्यास साधारण ८ ते १० वर्षे लागतात.

2) नव्या शाखा लहान शहरात असल्याने व्यवसायाचे प्रमाण कमी

3) ‘कासा’ व्याज उत्पन्न ३.६ टक्क्यांपर्यंत खाली

4) ‘एलडीआर’ प्रमाण ११० टक्के; विलिनीकरणाआधी हेच प्रमाण ८५ ते ८९ टक्के

5) नफ्याचे प्रमाण गृहकर्जापेक्षा इतर क्षेत्रांत जास्त

6) एलआयसी हाउसिंग, बजाज हाउसिंगसारख्या गृहकर्ज देणाऱ्या कंपन्या आघाडीवर

एचडीएफसी बॅंक देशातील खासगी क्षेत्रातील प्रथम क्रमांकाची आणि जगातील चौथ्या क्रमांकाची बॅंक ठरली आहे; मात्र येणारा काळ तिची परीक्षा घेणार आहे. तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

गुंतवणूकदारांसमोरचे पर्याय

1) दोन ते तीन वर्षे वाट पाहाणे आणि शेअर सुधारण्याची लक्षणे दिसू लागल्यावर पुन्हा खरेदी करणे

2) पडत्या भावात काही शेअर घेऊन ‘ॲव्हरेजिंग’ करणे

3) सर्व किंवा काही शेअर विकून तोटा कमी करून, प्राप्तिकर कमी करणे

4) विकून आलेल्या पैशातून चांगले वाढणारे शेअर घेणे

(डिस्क्लेमर : शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळे वाचकांनी गुंतवणुकीबाबतचा निर्णय स्वत:च्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com