Salary Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! पगारवाढ झाली मंजूर, एवढी होणार वाढ

केंद्र सरकारने आता आणखी काही कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यास मान्यता दिली आहे.
Salary
Salary esakal

Government Employees Salary Hike: केंद्र सरकारने आता आणखी काही कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. माहिती देताना मंत्रालयाने सांगितले की, कोल इंडिया लिमिटेडच्या बिगर कार्यकारी कर्मचार्‍यांसाठी कामगार संघटनांसोबतच्या वेतन सुधारणा कराराला मंजुरी देण्यात आली आहे.

आता या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारात बेसिक, व्हीडीए, विशेष महागाई भत्ता आणि बोनस इत्यादी फायदे मिळतील. याशिवाय भत्त्यात 25 टक्के वाढ होणार आहे.

कोल इंडियाला पाठवलेल्या नोटमध्ये मंत्रालयाने म्हटले आहे की कोल इंडिया लिमिटेड, सिंगरेनी कंपनी लिमिटेड आणि ट्रेड युनियन प्रतिनिधींच्या NCWA-XI साठी मान्यता देण्यात आली आहे.

या करारामुळे CIL आणि SCCL च्या सुमारे 2.81 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होईल, जे 1 जुलै 2021 पासून कंपनीसोबत काम करत आहेत.

करार मे महिन्यात झाला होता

कोळसा उद्योगासाठी संयुक्त द्विपक्षीय समिती (JBCCI)-XI च्या वतीने मे महिन्यात करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती, ज्यामध्ये CIL व्यवस्थापन, सिंगरेनी कंपनी लिमिटेड (SCCL), पाच केंद्रीय कामगार संघटना - BMS, HMS, AITUC, CITU, माइन वर्कर्स फेडरेशन यांचा समावेश होता.

Salary
Adani Group: गौतम अदानींना मोठा झटका, आता अमेरिकेत गुंतवणूकदारांची चौकशी सुरू, शेअर्समध्येही घसरण

तरतूद किती वाढली

CIL ने 1 जुलै 2021 ते 31 मार्च 2023 पर्यंतच्या 21 महिन्यांच्या कालावधीसाठी 9,252.24 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पगारासाठीच्या तरतुदीत वाढ झाल्यामुळे, आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 18 टक्क्यांनी कमी होऊन 5,528 कोटी रुपये झाला आहे.

पगारात 19 टक्के वाढ

कोळसा मंत्रालयाच्या या मंजुरीनंतर आता महागाई भत्त्याव्यतिरिक्त मूळ वेतन आणि इतरही वाढ होणार आहे. एकूण वाढ 19 टक्क्यांपर्यंत असू शकते. ही वाढ जुलै 2021 ते मार्च 2023 या एकूण 21 महिन्यांसाठी आहे.

Salary
Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com