
केंद्र सरकार होळीआधी महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करू शकतो. होळीच्या आधी जर सरकारने घोषणा केली तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढेल आणि पेन्शनधारकांचाही फायदा होईल. महागाई भत्त्याची घोषणा झाल्यास १.२ कोटी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ होणार आहे.