
Gross NPAs of Public Sector Banks: लोकांनी कर्ज घेतले आणि पैसे न फेडल्यामुळे बँकांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारनेच लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे 3 लाख कोटी रुपयांहून अधिक एनपीए झाले आहेत, म्हणजेच कर्जदारांनी हे पैसे परत केले नाहीत आणि हा पैसा अडकला आहे. ही रक्कम बँकांच्या एकूण थकीत कर्जाच्या 3.09 टक्के आहे.