GST : सप्टेंबरमध्ये ‘जीएसटी’१.७३ लाख कोटींवर; वार्षिक तुलनेत ६.५ टक्के वाढ, गेल्या ३९ महिन्यांतील सर्वांत कमी वेग

सरकारने वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) सप्टेंबरमध्ये एकूण १.७३ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमधील १.६२ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात ६.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
GST at Rs 1 73 lakh crore in September Year-on-year growth of 6 5 percent
GST at Rs 1 73 lakh crore in September Year-on-year growth of 6 5 percentsakal
Updated on

नवी दिल्ली : सरकारने वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) सप्टेंबरमध्ये एकूण १.७३ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमधील १.६२ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात ६.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये १.७५ लाख कोटी रुपये ‘जीएसटी’ मिळाला होता. त्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात थोडी घट झाली आहे.

सरकारने आज ही आकडेवारी जाहीर केली. गेल्या ३९ महिन्यांतील ‘जीएसटी’ वाढीचा सर्वांत कमी दर असून, वाढीचा वेग एकेरी आकड्यात असण्याचा हा आतापर्यंतचा दुसरा महिना आहे. यापूर्वी जूनमध्ये ७.७ टक्के वाढ नोंदविण्यात आला होता.

अधिकृत आकडेवारीनुसार, या महिन्यात २०,५४८ कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत त्यात ३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. परतावा समायोजित केल्यानंतर, सप्टेंबरमधील निव्वळ ‘जीएसटी’ महसूल १.५३ लाख कोटी रुपयांवर पोहोचला असून, मागील वर्षाच्या तुलनेत त्यात ३.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

एकूण ‘जीएसटी’मध्ये केंद्रसरकारचा ‘जीएसटी’ महसूल ३१,४०० कोटी रुपये, राज्य सरकारचा ‘जीएसटी’ ३९,३०० कोटी रुपये आणि एकात्मिक ‘जीएसटी’ ९०,६०० कोटी रुपये आहे, तर उपकर ११,९०० कोटी रुपये आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत एकूण ‘जीएसटी’ संकलन १०.८७ लाख कोटी रुपये असून,

आर्थिक वर्ष २०२४ मधील पहिल्या सहामाहीतील एकूण ‘जीएसटी’ संकलनाच्या तुलनेत ९.५ टक्क्यांनी अधिक आहे. सप्टेंबर महिन्यात, देशांतर्गत ‘जीएसटी’ महसूल ५.९ टक्क्यांनी वाढून सुमारे १.२७ लाख कोटी रुपये झाला आहे, तर वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल आठ टक्क्यांनी वाढून ४५,३९० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

ठळक वैशिष्ट्ये

  • सलग सातव्या महिन्यात ‘जीएसटी’ संकलन १.७० लाख कोटींहून अधिक

  • गेल्या ३९ महिन्यांतील ‘जीएसटी’ वाढीचा सर्वांत कमी दर

  • वाढीचा वेग एकेरी आकड्यात असण्याचा दुसरा महिना

  • पहिल्या सहामाहीत एकूण ‘जीएसटी’ १०.८७ लाख कोटी रु.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.