
सिगारेट, गुटखा, पान मसाला, फास्ट फूड यांसारख्या वस्तूंवर जीएसटी 28% वरून 40% करण्यात आला आहे.
ही नवी कर रचना 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार असून, तंबाखू उत्पादने आणि फास्ट फूड महागणार आहेत.
सरकारचा उद्देश आरोग्यावरील अपायकारक वस्तूंचा वापर कमी करणे आणि महसूल वाढवणे हा आहे.
GST Council Meeting: जीएसटी परिषदेच्या नव्या निर्णयानुसार सिगारेट, गुटखा, पान मसाला आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने वापरणाऱ्यांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. यापूर्वी या उत्पादनांवर 28 टक्के जीएसटी आकारला जात होता; आता तो थेट 40 टक्क्यांवर नेण्यात आला आहे. ही वाढलेली कर रचना 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. यासोबतच लक्झरी कार, शुगर ड्रिंक्स आणि फास्ट फूडवरही 40 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.