
सरकारने दिवाळीपूर्वी जीएसटीमध्ये मोठा बदल करत 12% आणि 28% स्लॅब हटवले असून आता फक्त 5% आणि 18% स्लॅब राहतील.
सोन्या-चांदीवरचा जीएसटी जसाच्या तसा ठेवला आहे – सोने-चांदीवर 3% आणि दागिने बनवण्याच्या शुल्कावर 5% कर लागू राहील.
सोन्याचा भाव विक्रमी पातळीवरून 1,239 रुपयांनी घसरून 1,05,956 रुपये झाला, चांदीतही घट दिसली.
GST on Gold: दिवाळीच्या अगोदरच केंद्र सरकारने जीएसटीमध्ये मोठा बदल करत मध्यमवर्गाला दिलासा दिला आहे. सरकारने चार कर स्लॅब्सऐवजी आता फक्त दोनच स्लॅब्स ठेवले आहेत – 5% आणि 18%. 12% आणि 28% या दोन्ही कर दरांना रद्द करण्यात आले आहे. यामुळे रोजच्या वापरातील अनेक वस्तू स्वस्त होणार असून लहान कार खरेदी करणाऱ्यांनाही फायदा होणार आहे.