

New GST rates slash FMCG product prices – Horlicks, Vicks, Zandu Balm, Dove, Pampers and more daily essentials now cheaper for Indian consumers.
Esakal
जीएसटी परिषदेने या महिन्याच्या सुरुवातीला वस्तू व सेवा कर (जीएसटी) च्या चार स्लॅबच्या जागी दोन स्लॅब करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आता कराचे दर 5% आणि 18% असतील, तर चैनीच्या वस्तूंवर 40% चा विशेष दर लागू होईल. या निर्णयाच्या परिणामी, दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किंमती कमी होत आहेत. प्रॉक्टर अँड गॅम्बल (पीएंडजी), इमामी आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (एचयूएल) यासारख्या दिग्गज एफएमसीजी कंपन्यांनी नव्या किंमत यादी जाहीर केल्या आहेत. या किंमती 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहेत. चला, जाणून घेऊया कोणत्या कंपनीने कोणत्या उत्पादनांच्या किंमती कमी केल्या.