
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज सामान्यांसाठी स्वस्ताईची ‘घट’मांडणी करताना वस्तू आणि सेवाकरातील (जीएसटी) निर्णायक सुधारणांच्या अनुषंगाने महत्त्वाचे पाऊल टाकले. सामान्यांना मोठा दिलासा देण्यात आला असून, डोक्याला लावायच्या तेलापासून ते मका, दूरचित्रवाणी संच, आरोग्य आणि आयुर्विमा यांच्यावरील ‘जीएसटी’ला कात्री लावण्यात आली आहे.