
दिवाळीपर्यंत जीएसटीमध्ये मोठे बदल होणार असून गरजेच्या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे.
मात्र पेट्रोल-डिझेलला जीएसटीखाली आणायला अजून वेळ लागणार आहे.
दारू, तंबाखू, सिगारेट यावर 40% जीएसटी बसू शकतो, तर इतर उत्पादनांवरील कर कमी होऊ शकतो.
GST on Petrol and Diesel: येत्या दिवाळीपर्यंत किंवा त्यानंतर सामान्य जनतेला जीएसटीच्या स्वरूपात मोठा दिलासा मिळू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरूनच याचे संकेत दिले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की आगामी काळात जीएसटीमध्ये मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे रोजच्या गरजेच्या वस्तू स्वस्त होऊ शकतात.