
Real Estate Scam: आपण आयुष्यभर पैसे साठवतो, कुणी कर्ज काढतं, कुणी सोनं मोडून आपले स्वतःचे घर घेण्याचं स्वप्न पाहतो. पण अशाच स्वप्नांची लक्तरं वेशीवर टाकणारे दोन भाऊ – सुभाष आणि रणवीर बिजाराणी. या दोघांनी "स्मार्ट सिटी"च्या नावावर तब्बल 70 हजार गुंतवणूकदारांना गंडवून 2676 कोटींचा घोटाळा केला आहे. हे प्रकरण केवळ राजस्थानापुरतं मर्यादित नाही, तर देशातल्या सगळ्यात मोठ्या रिअल इस्टेट फसवणुकीपैकी एक ठरतंय.