Niva Bupa IPO : हेल्थ इंश्युरन्स कंपनी निवा बुपाचा आयपीओ लवकरच, 3000 कोटी उभारण्याची तयारी...

यूकेमध्ये मुख्यालय असलेली आंतरराष्ट्रीय आरोग्य सेवा कंपनी बूपाने 2008 मध्ये जेव्हा भारतात व्यवसायाची स्थापना केली तेव्हा ती फाऊंडिंग शेयरहोल्डरही होती.
Niva Bupa IPO
Niva Bupa IPOSakal

खासगी आरोग्य विमा कंपनी निवा बुपा ( Niva Bupa) आयपीओ लाँच करण्याचा विचार करत आहे. कंपनी मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला मार्केट रेग्युलेटर सेबीकडे यासाठी ड्राफ्ट पेपर दाखल करू शकते. इश्यूच्या माध्यमातून सुमारे 3000 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे.

या आयपीओमध्ये, फ्रेश इक्विटी शेअर्स व्यतिरिक्त ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे शेअर्सची विक्री अपेक्षित असल्याचे सुत्रांकडून समजत आहे. अहवालानुसार निवा बुपाच्या आयपीओअंतर्गत सुमारे 600-800 कोटीचे नवीन शेअर्स जारी केले जाऊ शकतात. याव्यतिरिक्त, ओएफएसची साईज 2200-2400 कोटीच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

ट्रू नॉर्थ (इंडियन-फेटल टोन एलएलपी) निवा बुपा आयपीओच्या ओएफएसमध्ये एक मोठा विक्रेता असण्याची शक्यता आहे. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्समध्ये ट्रू नॉर्थची (इंडियन-फेटल टोन एलएलपी) 28 टक्के हिस्सेदारी आहे.

याशिवाय, बुपा सिंगापूरकडे निवा बुपा हेल्थ इन्शुरन्समध्ये 63 टक्के स्टेक आहे. फॅटल टोन एलएलपी हे ट्रू नॉर्थ फंड VI LLP द्वारे IRDAI (भारतीय विमा कंपन्यांमधील खाजगी इक्विटी फंडांद्वारे गुंतवणूक) मार्गदर्शक तत्त्वे 2017 अंतर्गत स्थापित केलेले एक विशेष उद्देश व्हेहिकल (SPV) आहे.

यूकेमध्ये मुख्यालय असलेली आंतरराष्ट्रीय आरोग्य सेवा कंपनी बूपाने 2008 मध्ये जेव्हा भारतात व्यवसायाची स्थापना केली तेव्हा ती फाऊंडिंग शेयरहोल्डरही होती. भारतातील सर्वात अनुभवी खाजगी इक्विटी फर्मपैकी एक ट्रू नॉर्थ 2019 मध्ये निवा बुपाची मेजोरिटी शेअरहोल्डर बनली. गेल्या वर्षी, ट्रू नॉर्थने निवा बुपामधील बहुसंख्य भागभांडवल त्यांच्या संयुक्त उपक्रम भागीदार बुपाला सुमारे 2,700 कोटी विकण्यास सहमती दर्शवली होती.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com