Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

हिंदुस्थान झिंकच्या (Hindustan Zinc) शेअर्समध्ये सध्या जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळत आहे.
Hindustan Zinc
Hindustan ZincSakal

हिंदुस्थान झिंकच्या (Hindustan Zinc) शेअर्समध्ये सध्या जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळत आहे. नुकताच हा शेअर 9 टक्क्यांनी वाढली. आर्थिक वर्ष 2024-25 या आर्थिक वर्षातील अंतरिम लाभांशावर निर्णय घेण्यासाठी कंपनीच्या बोर्डाची 7 मे रोजी बैठक होणार असल्याचे कंपनीने स्टॉक एक्सचेंजला सांगितले आहे.

लाभांश मंजूर झाल्यास त्याची रेकॉर्ड तारीख 15 मे 2024 असेल असे कंपनीने सांगितले. या तारखेपर्यंत ज्या शेअरहोल्डर्सची नावे कंपनीच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजच्या नोंदींमध्ये असतील ते लाभांश प्राप्त करण्यास पात्र असतील.

लाभांशच्या बातमीनंतर हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. शुक्रवारी सकाळी बीएसईवर शेअर 438.65 रुपयांच्या वाढीसह उघडला. दिवसभरात तो मागील बंद किंमतीपेक्षा 10.6 टक्क्यांनी वाढला आणि 478.05 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला.

हा शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. व्यवहाराच्या शेवटी, शेअर 9 टक्क्यांच्या वाढीसह 471.55 रुपयांवर स्थिरावला. कंपनीचे मार्केट कॅप 2 लाख कोटीच्या जवळपास आहे. प्रमोटर्सचा मार्च 2024 अखेर हिंदुस्तान झिंकमध्ये 64.92 टक्के हिस्सा होता.

तर 35.08 टक्के हिस्सा सार्वजनिक भागधारकांकडे होता. गेल्या एका महिन्यात शेअरची किंमत 31.6 टक्क्यांनी वाढली आहे. शेअरचा उच्चांक 518.30 रुपये आहे आणि नीचांक 345.60 रुपये आहे. सर्किट लिमिट 20 टक्के आहे.

हिंदुस्तान झिंक लिमिटेडचा जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा 21 टक्क्यांनी घसरून 2,038 कोटीवर आला आहे. नफा घसरण्याचे मुख्य कारण म्हणजे झिंकची कमी किंमत आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 च्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 2,583 कोटी होता. कंपनीचे एकत्रित उत्पन्न जानेवारी ते मार्च या तिमाहीत 7,822 कोटीवर घसरले, जे एका वर्षापूर्वी याच कालावधीत 8,863 कोटी होते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com