Online Auction : ऑनलाइन लिलावात १ रुपयांचे नाणे १० कोटी रुपयांचे कसे झाले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online Auction

Online Auction : ऑनलाइन लिलावात १ रुपयांचे नाणे १० कोटी रुपयांचे कसे झाले?

Online Auction : लहानपणी नाणी गोळा करणं हा छंद तुम्हालाही होता का? आपल्या घरातल्या मोठ्या जुन्या माणसांना याचा खूप नाद होता. असं म्हणतात ज्या व्यक्तीला हा छंद असतो तो एक उत्तम अंकशास्त्रवादी असतो.

तुम्हालाही हा छंद असेल तर भविष्यात बनू शकाल करोडोंचा मालक! जुनी नाणी विकून लोकांना लाखो-करोडो रुपये मिळतात. ऑनलाइन लिलावात या नाण्यांना चांगली किंमत मिळते. 1१,२,५ रुपयांचे नाणे किंवा नोटांच्या बदल्यात तुम्हाला १० लाख ते १ कोटी रुपये मिळू शकतात.

१ रुपयाला १० कोटी का मिळतात

ब्रिटिश राजवटीचे हे नाणे १८८५ मध्ये बनवले गेले होते आणि त्यामुळेच लिलावात त्याची किंमत इतकी जास्त होती. डीएनएच्या रिपोर्टनुसार, Indiamart.com आणि CoinBazar सारख्या वेबसाइट जुने आणि दुर्मिळ नाणे आणि नोटांच्या बदल्यात लाखो रुपये देतात. या वेबसाइटवर नाव, ई-मेल, फोन नंबर इत्यादी माहिती देऊन नोंदणी करता येते.

वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर, खरेदीदार तुमच्याशी संपर्क साधतात आणि तुम्ही वाटाघाटी करु शकता. जून २०२१ मध्ये, १९३३ साली बनवलेल्या अमेरिकन नाण्याचा न्यूयॉर्कमध्ये सुमारे १३८ कोटी रुपयांना लिलाव झाला.