Vastu Tips For Money : रात्री झोपण्यापूर्वी करा 'हे' सात काम, घरात पैशाची कमतरता कधीच राहणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vastu Tips For Money

Vastu Tips For Money : रात्री झोपण्यापूर्वी करा 'हे' सात काम, घरात पैशाची कमतरता कधीच राहणार नाही

Vastu Tips For Money : माता लक्ष्मीची मनोभावे पुजा करणाऱ्यांना कधीच पैशाची कमतरता जाणवत नाही. माता लक्ष्मी जर प्रसन्न झाली तर व्यक्तीच्या आयुष्यात सुख समृद्धी, धन आणि संपत्ती नेहमी वाढत जाते. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही लोक मंत्राचा जप करतात तर काही लोक पुजा अर्चना करतात.

वास्तु शास्त्रामध्येही धन आणि समृद्धीसाठी अनेक उपाय सांगितले आहे. पूजा पाठशिवाय रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही काही सोपे उपाय केले तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहते आणि धन-संपत्ती वाढते. चला तर जाणून घेऊया ते उपाय कोणते? (Vastu Tips For Money do these things before sleep goddess maa laxmi blessings it helps you to grow wealth)

  • रात्री्च्या वेळी माता लक्ष्मी वास असतो. अशात झोपण्यापूर्वी आपल्या घराच्या मुख्य द्वार साफ ठेवावा. घरात कोणत्याही प्रकारची अस्वच्छता नको. ज्यांचे घर स्वच्छ असतात, तिथेच माता लक्ष्मी वास करते.

  • रात्री झोपण्यापूर्वी देवघरात अंध ठेवू नये. रात्री झोपण्यापूर्वी छोटासा बल्ब लावावा किंवा तुपाचा दिवा लावावा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते.

  • वास्तु शास्त्रामध्ये उत्तर दिशा ही धन देवताची कुबेर दिशा मानली जाते. रात्री झोपण्यापूर्वी या दिशेला कचरा ठेवू नये. ही दिशा नेहमी स्वच्छ असावी. यामुळे नेहमी धनाची प्राप्ती होते.

  • रात्री झोपण्यापूर्वी घरातील झाडू उभा ठेवू नये. झाडू उभा ठेवल्याने, पाय लावल्याने माता लक्ष्मीचा अपमान होतो. झाडूचा उपयोग केल्यानंतर त्याला लपून ठेवावे. जमीनीवर आडवा ठेवावे.

  • झोपण्याची दिशाही खूप महत्त्वपूर्ण असते. जेवल्यानंतर जेव्हाही तुम्ही झोपी जाणार तेव्हा तुम्ही कोणत्या दिशेला झोपता, हे खूप महत्त्वाचं असते. नेहमी आपले डोके हे दक्षिण आणि पाय उत्तर दिशेला असावे.

  • जर तुमच्या घरी नकारात्मका जास्त असेल तर रात्रीच्या वेळी कापूरसोबत लवंग घालून जाळा हे काम जेवल्यानंतर करावे. हे काम दररोज केल्याने घरी धनसंपत्ती वाढते.

  • देवघरात  शिळे फूल आणि पाणी कधीही ठेवू नये यामुळे लक्ष्मी माता नाराज होते ज्याचा थेट परिणाम तुमच्या धनसंपत्तीवर होतो.