Ratan Tata Resume: रतन टाटा यांनी स्वतःच्याच कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी तयार केला होता बायोडाटा

Ratan Tata Birthday:टाटा समूहाचा 155 वर्षांचा वारसा पुढे नेणारे रतन टाटा आज जगात एक यशस्वी उद्योगपती म्हणून ओळखले जातात. यासोबतच समाजाच्या भल्यासाठी त्यांनी खूप काम केले आहे. रतन टाटा हे निःसंशयपणे आज एक यशस्वी उद्योगपती म्हणून ओळखले जातात
Ratan Tata Resume
Ratan Tata ResumeSakal

Ratan Tata Birthday: टाटा समूहाचा 155 वर्षांचा वारसा पुढे नेणारे रतन टाटा आज जगात एक यशस्वी उद्योगपती म्हणून ओळखले जातात. यासोबतच समाजाच्या भल्यासाठी त्यांनी खूप काम केले आहे. रतन टाटा हे निःसंशयपणे आज एक यशस्वी उद्योगपती म्हणून ओळखले जातात, परंतु रतन टाटा यांनी आपल्या करिअरची सुरुवात कर्मचारी म्हणून केली होती हे फार कमी लोकांना माहीत आहे.

त्यांची पहिली नोकरी टाटा ग्रुपमध्ये नव्हती, पण ते दुसऱ्या कंपनीत रुजू झाले होते आणि त्याच कंपनीत काम करत असताना त्यांनी टाटा ग्रुपमध्ये नोकरी मिळवण्यासाठी बायोडाटा बनवला होता. आज रतन टाटा 86 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील हा किस्सा.

IBM मध्ये पहिली नोकरी

शिक्षणासाठी रतन टाटा अमेरिकेत गेले होते. तिथे त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आणि त्यानंतर त्यांनी तिथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. (First job at IBM)

पण दरम्यानच्या काळात त्यांची आजी नवजबाई यांची प्रकृती खालावल्याने त्यांना भारतात परतावे लागले. भारतात परतल्यानंतर, रतन टाटा यांनी टाटा समूहात पहिली नोकरी केली नाही, ते IBM मध्ये रुजू झाले आणि त्यांच्या कुटुंबातील कोणालाही ही गोष्ट माहिती नव्हती.

जेआरडी टाटांनी खडसावले

टाटा समूहाचे तत्कालीन चेअरमन जेआरडी टाटा यांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा ते खूप संतापले आणि त्यांनी रतन टाटा यांना फोन करून सांगितले की, 'तुम्ही भारतात राहून आयबीएमसाठी काम करू शकत नाही.' यासोबतच त्यांनी रतन टाटा यांना त्यांचा बायोडेटा शेअर करण्यास सांगितले.

Ratan Tata Resume
Ratan Tata Birthday : फक्त वडिलांच्या इच्छेखातर आर्किटेक्ट रतन टाटा बनले इंजिनियर, जाणून घ्या यशोगाथा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी रतन टाटा यांच्याकडे त्यांचा बायोडाटा नव्हता, त्यामुळे त्यांनी आयबीएम ऑफिसमध्ये इलेक्ट्रिक टाइपरायटरवर टाईप करून त्यांचा बायोडाटा तयार केला. त्यांचा बायोडेटा शेअर केल्यानंतर त्यांना 1962 मध्ये टाटा इंडस्ट्रीजमध्ये नोकरी मिळाली.

टाटा कुटुंबातील सदस्य असूनही नोकरी स्वीकारल्यानंतर रतन टाटा यांना त्यांच्या कंपनीतील सर्व कामे करावी लागली. सर्व कामांचा अनुभव घेत ते कंपनीच्या उच्च पदापर्यंत पोहोचले.

Ratan Tata Resume
Ratan Tata: रतन टाटांच्या मदतीने अवघ्या 21व्या वर्षी उभारली 500 कोटींची कंपनी

1991 मध्ये टाटा सन्स आणि टाटा समूहाचे अध्यक्ष बनले

1991 मध्ये रतन टाटा यांनी टाटा सन्स आणि टाटा समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले. त्यांनी 21 वर्षे टाटा समूहाचे नेतृत्व केले आणि त्याला मोठ्या उंचीवर नेले. त्यांच्या नेतृत्वाखाली टेटली टी, जग्वार लँड रोव्हर आणि कोरस या कंपन्यांचे अधिग्रहण करण्यात आले. त्यांच्या देखरेखीखाली टाटा समूहाचा 100 हून अधिक देशांमध्ये विस्तार झाला. (Became Chairman of Tata Sons and Tata Group in 1991)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com