
How To Check Gold Purity: लग्नाचा हंगाम जवळ जवळ आला आहे. अनेकांच्या घरात सोन्याची खरेदी सुरू आहे. मात्र, खरेदी केलेले दागिने खरे की बनावट, हा प्रश्न अनेकदा पडला असेल. अशा प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी भारतीय मानक ब्युरोने एक ॲप सुरू केले होते. ज्याचा वापर कसा करायचा हे अनेकांना माहीत नाही.
सोने खरेदीदार भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या ‘BIS केअर ॲप’ची मदत घेऊ शकतात. हे ॲप तुम्हाला सर्व ISI आणि हॉलमार्क-प्रमाणित सोन्या-चांदीच्या दागिन्यांची माहिती देण्यास मदत करेल.