Maharashtra Budget : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कसा समजून घ्यायचा ? देवेंद्र फडणवीस सांगतात सोप्या टिप्स

Maharashtra Budget 2025 explained by Devendra Fadnavis: कसा तयार होतो राज्याचा अर्थसंकल्प ते जाणून घ्या
maharashtra budget
maharashtra budget devendra fadnavisesakal
Updated on

Maharashtra Budget : आज देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दुसऱ्या इनिंगमधला पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार आपल्या विक्रमी ११ व्या अर्थसंकल्पात राज्याच्या पदरात काय टाकणार यावर सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. मात्र राज्याचा अर्थसंकल्प नेमका कसा तयार होतो असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. पण तुम्हाला माहितीये काय? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकातच दडलंय.

काही वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एक पुस्तक लिहीलं होतं. याच पुस्तकात त्यांनी राज्याचा बजेट कसा तयार होतो याबाबत लिहीले आहे. यंदाचा अर्थसंकल्प विशेष असण्यामागचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी केलेली घोषणा. त्यांच्या घोषणेत त्यांनी हा महाराष्ट्राचा महाअर्थसंकल्प आणि जनसंकल्प असेल असे जाहीर केले.

कसा तयार होतो राज्याचा अर्थसंकल्प?

अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नव्हे तर वर्षभरात गाठावयाची उद्दिष्टे आणि त्यासाठी उपलब्ध संसाधने यांचा तो ताळेबंद असतो. आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने जमा व खर्च यांचे वस्तुनिष्ठ अंदाज तयार करणे आवश्यक असते. अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर होत असला तरी तो तयार करण्याची व त्याचा आधावा घेण्याची प्रक्रिया वर्षभर सुरु असते.

maharashtra budget
Maharashtra Budget 2023 : अर्थसंकल्प कसा वाचावा अन् समजून घ्यावा, जाणून घ्या अगदी सोप्या भाषेत

आगामी वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया साधारणपणे सप्टेंबरमध्ये महिन्यातच सुरु झालेली असते.वर्ष 2025 -2026 वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम गेल्या सप्टेंबर महिन्यात सुरु होत असते. अर्थसंकल्प तयार करण्यासाठी प्रशासनाने राबवायच्या प्रक्रियेचे वेळापत्रक व सूचना वित्त विभाग जारी करतो. प्रत्येक विभागांतर्गत येणारी सर्व राज्याबाहेरील, राज्यस्तरीय व क्षेत्रीय कार्यालये आपापले खर्चाचे अंदाज संबंधित विभाग प्रमुखांना सादर करतात. (Devendra Fadanavis)

maharashtra budget
Maharashtra Budget 2023 : सर्वसामान्यांना बजेटकडून मोठ्या आशा; अर्थमंत्री पूर्ण करणार का 'या' मागण्या?

मागील व चालू वर्षातील खर्चाचे कल. येत्या वर्षातील गरजा लक्षात घेऊन हे अंदाज तयार होतात. विभाग प्रमुख छाननी नंतर सदर अंदाज वित्त विभागास सादर करतात. खर्चाप्रमाणे महसूल व जमा याचीही अंदाज अशाच पद्धतीने तयार केले जातात. याशिवाय, केंद्र शासनाकडून मिळणारी अनुदाने, करातील हिस्सा आदी बाबीही लक्षात घेतल्या जातात. या अंदाजांचे महसुली व भांडवालीआणि भारित व दत्तमत असे वर्गीकरण केले जाते. (Budget)

संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये जमा खर्चाचा आढावा घेतला जात असतो. जो खर्च अपेक्षित नव्हता, त्यासाठी ज्याप्रमाणे पुरवणी मागण्या केल्या जातात, त्याचप्रमाणे जेथे अंदाजित केल्याप्रमाणे खर्च होण्याची परिस्थिती नसेल, अशा ठिकाणी रकमा परत घेतल्या जातात. जेणेकरून त्यांचे पुनर्विनियोजन होऊ शकेल. आगामी वर्षाचे अंदाज तयार करण्यापूर्वी चालू वर्षाचे सुधारित अंदाजही तयार केले जातात.

https://www.devendrafadnavis.in/budget_2020

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com