
First Woman CEO Of Hindustan Unilever: भारताच्या आघाडीच्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेल्या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) कंपनीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. प्रिया नायर यांची HUL च्या नवीन CEO आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून निवड केली आहे. त्या 1 ऑगस्ट 2025 पासून पदभार स्वीकारतील. या नियुक्तीमुळे HUL मध्ये महिलांच्या नेतृत्वाचा नवीन अध्याय सुरू होणार आहे, कारण प्रिया नायर या HUL च्या पहिल्या महिला CEO आहेत.