ICICI Bank: बँकेची मोठी घोषणा... आता खात्यात 10,000 रुपयांऐवजी किमान 50,000 रुपये ठेवावे लागतील

ICICI Bank Raises Minimum Balance: जर तुमचंही खाते ICICI बँकेत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. खासगी क्षेत्रातील अग्रगण्य बँक ICICI ने आपल्या सेव्हिंग्ज अकाऊंट्ससाठी किमान सरासरी ठेव (Minimum Average Balance) पाचपट वाढवला आहे.
ICICI Bank Raises Minimum Balance
ICICI Bank Raises Minimum BalanceSakal
Updated on
Summary
  • ICICI बँकेने मेट्रो व शहरी भागातील सेव्हिंग्ज अकाऊंटसाठी किमान बॅलन्स ₹10,000 वरून थेट ₹50,000 केला आहे.

  • अर्धशहरी भागासाठी ₹25,000 आणि ग्रामीण भागासाठी ₹10,000 इतकी मर्यादा आहे.

  • 1 ऑगस्ट 2025 पासून लागू झालेल्या या नियमामुळे ICICI देशातील सर्वाधिक मिनिमम बॅलन्स असलेली बँक ठरली आहे.

ICICI Bank Raises Minimum Balance: जर तुमचंही खाते ICICI बँकेत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. खासगी क्षेत्रातील अग्रगण्य बँक ICICI ने आपल्या सेव्हिंग्ज अकाऊंट्ससाठी किमान सरासरी ठेव (Minimum Average Balance) पाचपट वाढवला आहे.

आता मेट्रो आणि शहरी भागातील खातेदारांना किमान ₹50,000 खात्यात ठेवावे लागणार आहेत. हा नवा नियम 1 ऑगस्ट 2025 पासून लागू झाला आहे. याआधी ही मर्यादा फक्त ₹10,000 होती. जर खात्यात आवश्यक शिल्लक नसेल, तर खातेदारांना दंड भरावा लागेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com