
केंद्र सरकारने आठ सरकारी कंपन्यांच्या विक्रीची योजना आखली असून IDBI बँकेचं खासगीकरण डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे.
IDBI बँकेतील 60.72% हिस्सा विकून सरकार आणि LIC ला तब्बल 50,000 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.
फेअरफॅक्स इंडिया, एमिरेट्स एनबीडी आणि कोटक महिंद्रा बँक या कंपन्या IDBI बँक खरेदी करण्याच्या शर्यतीत आहेत.
IDBI Bank Divestment on Track: देशात सरकारी कंपन्याच्या विक्रीच्या योजनेला वेग येण्याची शक्यता आहे. मिंटच्या अहवालानुसार, केंद्र सरकारने आठ सरकारी कंपन्या विकण्याची तयारी केली आहे. यामध्ये बीईएमएल लिमिटेड, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एचएलएल लाइफकेअर लिमिटेड, प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडिया, इंडियन मेडिसिन्स फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे. याशिवाय, IDBI बँकेचं खासगीकरण डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. उर्वरित कंपन्यांची विक्रीही याच आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत (Q4) केली जाऊ शकते.