Artificial intelligence: आपल्याकडे खूपच कमी वेळ उरलाय... एआयवर IMF प्रमुखांनी केली मोठी भविष्यवाणी

IMF Chief Kristalina Georgieva: आर्टिफिशियल इंटेलिजन्स लवकरच नोकरीच्या बाजारपेठेत आमूलाग्र बदल घडवून आणणार आहे आणि त्सुनामीसारखा या बाजारावर परिणाम करत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी हे वक्तव्य केले आहे.
IMF Chief Kristalina Georgieva warns of AI tsunami hitting job market
IMF Chief Kristalina Georgieva warns of AI tsunami hitting job market Sakal

IMF Chief Kristalina Georgieva: आर्टिफिशियल इंटेलिजन्स लवकरच नोकरीच्या बाजारपेठेत आमूलाग्र बदल घडवून आणणार आहे आणि त्सुनामीसारखा या बाजारावर परिणाम करत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी हे वक्तव्य केले आहे.

त्यांनी चेतावणी दिली की पुढील दोन वर्षांत, एआय विकसित देशांमधील 60 टक्के नोकऱ्यांवर आणि जगभरातील 40 टक्के नोकऱ्यांवर परिणाम करु शकतो. जॉर्जिव्हाने या बदलांसाठी तयार राहण्यावर भर दिला आहे. "आमच्याकडे यासाठी लोक आणि व्यवसाय तयार करण्यासाठी फारच कमी वेळ आहे," असे त्या म्हणाल्या.

एआयमुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादकता वाढवू शकते

क्रिस्टालिना जॉर्जिव्हा म्हणाल्या की एआय उत्पादन वाढवू शकते आणि गोष्टी अधिक कार्यक्षम बनवू शकते. परंतु यामुळे चुकीची माहितीही वाढू शकते आणि उत्पन्नातील अंतर वाढू शकते. AI चा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी काळजीपूर्वक व्यवस्थापन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

जॉर्जिव्हा पुढे म्हणाल्या, "जर आपण ते चांगल्या प्रकारे हाताळले तर यामुळे उत्पादकतेत प्रचंड वाढ होऊ शकते, परंतु यामुळे आपल्या समाजात अधिक चुकीची माहिती आणि निश्चितपणे अधिक असमानता देखील वाढू शकते."

IMF Chief Kristalina Georgieva warns of AI tsunami hitting job market
Cognizant: कॉग्निझंट कंपनीचा धक्कादायक निर्णय! कर्मचाऱ्यांनी ऑफिसला न आल्यास जाणार नोकरी; काय आहे प्रकरण?

IMF प्रमुखांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या त्यांच्या AI मॉडेलचे अधिक शक्तिशाली आवृत्त्या तयार करण्यात व्यस्त आहेत. OpenAI ने अलीकडेच नवीन GPT-4o मॉडेल लाँच केले आहे, जे सर्व वापरकर्त्यांसाठी विनामूल्य आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती

कोविड-19महामारी, त्यानंतरचे रशिया-युक्रेन युद्ध, जागतिक चलनवाढ आणि इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धासारखी भौगोलिक राजकीय आव्हाने असूनही, जागतिक अर्थव्यवस्था सध्या अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत आहे. जॉर्जिव्हा म्हणाल्या की, सध्या कोणतीही जागतिक मंदी नाही आणि गेल्या वर्षी अर्थव्यवस्था खाली येण्याची चिंता होती ती आता राहिली नाही.

IMF Chief Kristalina Georgieva warns of AI tsunami hitting job market
Haldiram: तुमचा आवडता हल्दीराम ब्रँड लवकरच परदेशी कंपनीच्या हातात जाणार? सर्वात मोठ्या कंपनीने लावली बोली

आता अनेक ठिकाणी महागाईचा वेगही मंदावू लागला आहे. जॉर्जिव्हा यांना वाटते की हवामान बदलामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अनेक आव्हाने वाढू शकतात. या वर्तमान आणि भविष्यातील समस्यांना तोंड देण्यासाठी मजबूत रणनीती आखणे महत्त्वाचे आहे असे त्यांचे मत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com