

Income Tax Department
Sakal
Income Tax Department : आयकर विभाग केवळ तुमचा पगार किंवा व्यवसायिक उत्पन्नच पाहत नाही, तर तुमच्या बँकिंग व्यवहारांवरही बारकाईने नजर ठेवतो.आयकर विभागाकडे 'स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स' अंतर्गत बँका, NBFCs, म्युच्युअल फंड हाउसेस, दागिने विक्रेते आणि ट्रॅव्हल एजन्सीज माहिती देतात. त्यामुळे यात तुमचे खर्च आणि जाहीर केलेले उत्पन्न जुळत नसेल, तर आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवू शकतो.