Income Tax Notice: आयकर विभागाने 22,000 करदात्यांना पाठवल्या नोटिसा, कारण कळलं तर फुटेल घाम

Income Tax Notice: आयकर विभागाने गेल्या 15 दिवसांत 22 हजार करदात्यांना नोटिसा पाठवल्या आहेत.
Income Tax Notice
Income Tax NoticeSakal

Income Tax Notice: आयटीआर भरताना तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण काही चुकांमुळे आयकर विभाग नोटीस पाठवू शकतो. आयकर विभाग करदात्यांना आयकर रिटर्न (ITR) भरताना दावा केलेल्या कर सूट आणि कपातीचा पुरावा मागण्यासाठी नोटीस पाठवत आहे.

आयकर विभागाने गेल्या 15 दिवसांत 22 हजार करदात्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. त्यांनी आयकर विवरणपत्रात दिलेली माहिती आयकर विभागाच्या आकडेवारीशी जुळत नसल्याने या नोटिसा देण्यात आल्या आहेत. ज्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत त्यात पगारदार करदाते, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), आणि ट्रस्ट यांचा समावेश आहे.

Income Tax Notice
G20 Summit 2023: मुकेश अंबानी ते गौतम अदानी, देशातील हे टॉप 500 उद्योगपती G20 मध्ये होणार सहभागी

आयकर रिटर्नमध्ये दावा केलेला कर कपातीचा फॉर्म 16 किंवा करदात्यांनी दिलेली माहिती आयकर विभागाच्या डेटाशी जुळत नाही. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आयकर विभागाने 12 हजार पगारदार करदात्यांना नोटिसा पाठवल्या आहेत.

अशा पगारदार करदात्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत ज्यांनी आयकर कपातीचा दावा केला आहे. याशिवाय 8 हजार हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF) करदात्यांना आयकर विभागाने नोटिसा पाठवल्या आहेत.

Income Tax Notice
Tata-Haldiram Deal: टाटा समूहाने हल्दीराममधील 51 टक्के स्टेक खरेदीचे वृत्त फेटाळले, कंपनीने सांगितलं...

त्यांनी दाखल केलेले उत्पन्न आणि आयकर विभागाचे आकडे यामध्ये 50 लाख रुपयांपेक्षा जास्त फरक आहे. 1,200 ट्रस्ट आणि पार्टनरशिप फर्म्सच्या आयकर रिटर्नमध्ये दर्शविलेले उत्पन्न आणि विभागाच्या डेटामध्ये 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त फरक आहे. त्यांना माहितीच्या नोटिसाही देण्यात आल्या आहेत.

दोन लाख करदात्यांच्या आयटीआरमध्ये त्रुटी

आयकर विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, 2 लाख करदात्यांच्या आयकर विवरणपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यांनी आयटीआर किंवा बँक खात्याच्या तपशिलांमध्ये दिलेले उत्पन्न किंवा खर्च विभागाच्या डेटाशी जुळत नाही. आयकर विभागाने लिंक्ड बँक आणि यूपीआय व्यवहारांच्या आधारे या आयकरदात्यांकडून हा डेटा गोळा केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com