Income Tax Return: रिफंड मिळाल्यानंतरही तुम्ही ITR मध्ये करु शकता सुधारणा, कसं ते जाणून घ्या!

Income Tax Refund: आयकर कायद्यांतर्गत आयकर रिटर्न भरल्यानंतरही तुम्ही तुमचा आयटीआर पुन्हा दुरुस्त करू शकता.
Income Tax Return
Income Tax ReturnSakal

Revised ITR Filing: आयकर विभागाने यावेळी कडक धोरण अवलंबले आहे. अशा परिस्थितीत आयकर रिटर्न भरताना करदात्यांनी आयटीआरमध्ये त्यांच्या उत्पन्नाची योग्य माहिती दिली पाहिजे.

अनेक वेळा करदाते बँक खात्यातील ठेवींच्या व्याज उत्पन्नाबद्दल योग्य माहिती देऊ शकत नाहीत किंवा चुकीच्या कपातीचा दावा केला जातो.

जर तुमच्यासोबतही असे घडले असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. इतकेच नाही तर आयकर विभागाकडून कमी परतावा मिळाल्यास त्याविरुद्ध अपील करण्याचीही तरतूद आहे.

सुधारित विवरणपत्र 139(5) अंतर्गत भरता येईल

आयकर कायद्यांतर्गत आयकर रिटर्न भरल्यानंतरही तुम्ही तुमचा आयटीआर पुन्हा दुरुस्त करू शकता. आयकर कायद्याच्या कलम 139(5) अंतर्गत, करदाते सुधारित आयकर रिटर्न भरून आयटीआरमध्ये झालेल्या चुका सुधारू शकतात.

या कायद्यानुसार, आयटीआर भरल्यानंतर, जर करदात्याला असे वाटत असेल की त्याने काहीतरी घोषित करणे राहिले आहे किंवा काही चूक झाली आहे, तर तो सुधारित रिटर्न भरून आयटीआर सुधारू शकतो.

करदात्यांना ही दिलासा देणारी बाब आहे की त्यांच्या आयकर रिटर्नवर प्रक्रिया झाली असली तरी ते कलम 139(5) अंतर्गत ऑनलाइन रिव्हाइज रिटर्न भरू शकतात.

असे देखील होऊ शकते की करदात्याच्या आयटीआरची प्रक्रिया केली गेली आहे आणि त्याला परतावा मिळाला आहे. अशा प्रकरणांमध्ये, रिफंड मिळाल्यानंतरही, आयटीआर दुरुस्त करण्यासाठी करदाता सुधारित रिटर्न दाखल करू शकतो.

Income Tax Return
Restaurants Service Charge: रेस्टॉरंट्सच बिल नेहमीच जास्त... न विचारता जोडला जातोय सेवा शुल्क!

31 डिसेंबरपर्यंत सुधारित विवरणपत्र भरता येईल

सुधारित रिटर्न हे मूल्यांकन वर्ष संपण्‍याच्‍या अगोदरपर्यंत दाखल केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, चालू मूल्यांकन वर्ष 2023-24 च्या बाबतीत, तुम्ही आयकर रिटर्न भरले आहे ज्यामध्ये काही चूक झाली आहे, त्यानंतर 31 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्ही सुधारित आयटीआर दाखल करू शकता.

उशीरा ITR दाखल करणारे करदाते सुधारित ITR देखील दाखल करू शकतात. 2019-20 पर्यंत, 31 मार्चपर्यंत सुधारित रिटर्न भरण्याची सुविधा होती, आता सरकारने तीन महिन्यांची मुदत कमी केली आणि ती आता 31 डिसेंबर केली आहे.

कमी परतावा मिळाल्यास काय करावे?

समजा तुम्ही आयटीआर दाखल केला आहे आणि तुम्ही दावा केला होता त्यापेक्षा तुम्हाला कमी कर परतावा मिळत असेल, तर तुम्हाला आयकर कायद्यांतर्गत विभागाकडे अपील करण्याचा अधिकार आहे.

जर एखाद्या करदात्याला फॉर्म 26AS मध्ये TDS क्रेडिट असूनही कमी कर परतावा मिळत असेल, तर तो आयकर कायद्याच्या कलम 154 अंतर्गत सुधारणा विनंती दाखल करून शिल्लक कर परतावा मागू शकतो. आयकर विभाग करदात्यांच्या विनंतीची पडताळणाी केल्यानंतर त्यांना थकबाकी परतावा जारी करू शकतो.

Income Tax Return
Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com