
थोडक्यात:
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला 50 दिवसांत युद्ध संपवण्याची धमकी दिली आहे, नाहीतर 100% टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे.
रशियन तेलावर अवलंबून असलेल्या भारतात पेट्रोल-डिझेलचे दर 8-10 रुपये प्रति लिटर वाढण्याची शक्यता आहे.
भारताने 40 देशांकडून तेल आयातीसाठी बॅकअप प्लॅन तयार केला असला, तरी रशियाचा पुरवठा खंडित झाला तर बाजारात क्रूड ऑईलच्या किंमती 130-140 डॉलरपर्यंत जाऊ शकतात.
Petrol Diesel Price: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा धमकी दिली आहे. ट्रम्प आता रशियावर दबाव आणत आहेत. त्यांनी रशियाला स्पष्ट धमकी दिली आहे की, 50 दिवसांच्या आत रशियाने युक्रेनसोबतचे युद्ध संपवले नाही तर रशियावर आणि रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 100% टॅरिफ लावले जाईल. ही अप्रत्यक्ष धमकी भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या देशांसाठी आहे, जे रशियाकडून मोठ्या प्रमाणात स्वस्त कच्चे तेल विकत घेत आहेत.