India forex reserves
esakal
देशाच्या परकीय चलन साठ्यात मोठी घसरण झाली आहे. अवघ्या एका आठवड्यात भारताच्या परकीय चलन साठ्यातून तब्बल १४.२०५ अब्ज डॉलर कमी झाले आहेत. त्यामुळे देशाचा परकीय चलन साठा आता ७०५.३४२ अब्ज डॉलरवर आला आहे. रुपयाला आधार देण्यासाठी परकीय चलन खर्च झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर सोन्याच्या किमती घसरल्याने सोन्याच्या साठ्याचे मूल्यही कमी झाले आहे.