
India Found Latest Gold Mine : भारतात सोन्याचा दर काही दिवसांतच १ लाखाचा ऐतिहासिक आकडा पार करण्याच्या उंबरठ्यावर आहे. सोनं प्रचंड महाग झाल्यानं भारतीयांना सोन्यात गुंतवणूक करणंही अवघड होणार आहे. त्याचबरोबर सणावाराला सोनं खरेदी करण्याच्या प्रथेवरही त्यामुळं परिणाम होण्याची शक्यता आहे.
तसंच लग्न कार्यासाठी सोन्याला पर्याय शोधावा लागणार आहे. पण यातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, भारताला जॅकपॉट लागला असून काही राज्यांमध्ये सोन्याच्या मोठ्या खाणी सापडल्या असून त्याची किंमत ऐकूण तुम्ही चक्रावून जालं.