
India Government Loan: केंद्र सरकार आपला खर्च भागवण्यासाठी लवकरच मोठे कर्ज घेणार आहे. सरकारने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर) सिक्युरिटीजद्वारे 8 लाख कोटी रुपयांचे कर्ज उभारण्याची योजना आहे. महसुली तुटवडा भरून काढण्यासाठी ही रक्कम उभी केली जाईल.