

Benefits for Daily Commuters and FASTag Users
esakal
Why Government Introduced the New Toll Policy : राष्ट्रीय महामार्गांवरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता नवीन राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर (एक्सप्रेसवे) दोन टोल नाक्यांमध्ये किमान ६० किलोमीटरचे अंतर राखणे अनिवार्य असणार आहे. वारंवार टोल आकारणीबाबतच्या तक्रारी आणि जनतेच्या मागण्या लक्षात घेऊन सरकारने हा नवीन नियम लागू केला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा महामार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्यांना फायदा होणार आहे.