
भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक कामगिरी करत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा मान मिळवला आहे. NITI आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी शनिवारी (24 मे 2025) NITI आयोगाच्या 10व्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. “आज भारत $4 ट्रिलियनची अर्थव्यवस्था आहे. आम्ही जपानला मागे टाकून चौथ्या क्रमांकावर आहोत,” असे सुब्रह्मण्यम यांनी सांगितले.