Indian Economy: 2030 पर्यंत भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल; S&P Globalने वर्तवला अंदाज

Indian Economy: 2026-27 या आर्थिक वर्षात देशाचा विकास दर 7% पर्यंत पोहोचेल असा अंदाज एजन्सीने व्यक्त केला आहे.
India set to become third-largest economy by 2030 says S&P Global Ratings
India set to become third-largest economy by 2030 says S&P Global Ratings eSakal

Indian Economy: 2030 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे S&P ग्लोबल रेटिंग्सचे म्हणणे आहे. 2026-27 या आर्थिक वर्षात देशाचा विकास दर 7% पर्यंत पोहोचेल असा अंदाज एजन्सीने व्यक्त केला आहे.

ग्लोबल क्रेडिट आउटलुक 2024 मध्ये, S&P ने लिहिले की 'आमचा विश्वास आहे की भारताचा GDP वाढीचा दर 2024-25 या आर्थिक वर्षात 6.4% असेल. तर आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये GDP वाढीचा दर 6.9% पर्यंत पोहोचेल.

एजन्सीने पुढे लिहिले की, 'भारत 2030 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि आमची अपेक्षा आहे की प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी भारत पुढील तीन वर्षांसाठी सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल.' सध्या भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताच्या पुढे अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान आहेत.

रेटिंग एजन्सी मूडीजने मंगळवारी चीनच्या अर्थव्यवस्थेचा दृष्टीकोन 'स्थिर' वरून 'नकारात्मक' केला. याचे कारण आर्थिक वाढीत घसरण आणि मालमत्ता क्षेत्रात घसरण होत आहे. एजन्सीने चीनचे एकूण रेटिंग 'A1' वर कायम ठेवले आहे.

India set to become third-largest economy by 2030 says S&P Global Ratings
गेल्या 5 वर्षात बँकांनी केले 10.6 लाख कोटींचे कर्ज राइट-ऑफ; सर्वाधिक वाटा उद्योग क्षेत्राचा

S&P ने म्हटले आहे की 2024 मध्ये 50 पेक्षा जास्त देशांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्याचा जागतिक परिणाम होऊ शकतो. युद्धग्रस्त रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये मार्चमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत.

India set to become third-largest economy by 2030 says S&P Global Ratings
RBI Action: रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई! 'या' बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांच्या पैशांचे काय होणार?

फिचनेही वर्तवला होता अंदाज

नोव्हेंबरच्या सुरुवातीला फिचने भारताचा वाढीचा अंदाज 0.7 टक्क्यांनी वाढवून 6.2 टक्के केला होता. यापूर्वी एजन्सीचा अंदाज 5.5 टक्के होता. फिचने म्हटले आहे की 2023-24 साठी भारताचा विकास दर 6.3 टक्के असेल. (Fitch prediction)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com