
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँका कर्जपुरवठ्यात वाढ करण्यासाठी येत्या तीन ते चार महिन्यांत नव्या योजना दाखल करतील. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसह (एमएसएमई) सर्व क्षेत्रांना कर्जपुरवठा करण्यासाठी या योजना महत्त्वपूर्ण ठरतील,अशी माहिती वित्तीय सेवा सचिव एम नागराजू यांनी आज येथे औद्योगिक महासंघातर्फे (सीआयआय) आयोजित आर्थिक समावेशन आणि फिनटेक परिषदेत दिली.