
देशातील सर्वात मोठी आणि सरकारी तेल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पेरेशनच्या रिफायनरीला आता वापरलेल्या तेलापासून सस्टेनेबल एविएशन फ्यूएल बनवण्याचं सर्टिफिकेट मिळालंय. यामुळे आता घरी, रेस्टॉरंटमध्ये पदार्थ तळल्यानंतर वाया जाणाऱ्या खाद्यतेलापासून विमानासाठी इंधन तयार करण्याचा मार्ग मोकळा झालाय. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे चेअरमन अरविंदर सिंह साहनी यांनी याबाबत माहिती दिली. सस्टेनेबल एविएशन फ्युएल तयार करण्यास पानीपतमधील रिफायनरीमध्ये डिसेंबरपासून सुरुवात होईल असं कंपनीकडून सांगण्यात आलंय.