IREDA : इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (आयआरईडीए) (शुक्रवारचा बंद भाव : रु. २२८)

इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (आयआरईडीए) हा ऊर्जा मंत्रालयाच्या (एमएनआरई) प्रशासकीय नियंत्रणाखालील केंद्र सरकारचा एक ‘नवरत्न’ उपक्रम आहे.
IREDA
IREDA Sakal

- भूषण गोडबोले

इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (आयआरईडीए) हा ऊर्जा मंत्रालयाच्या (एमएनआरई) प्रशासकीय नियंत्रणाखालील केंद्र सरकारचा एक ‘नवरत्न’ उपक्रम आहे. ही एक पब्लिक लिमिटेड सरकारी कंपनी आहे.तिची स्थापना १९८७ मध्ये ‘नॉन-बँकिंग’ वित्तीय संस्था म्हणून झाली आहे.

‘नॉन-बँकिंग, नॉन-डिपॉझिट’ घेणारी ही कंपनी नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रासाठी वित्तपुरवठा करणारी कंपनी आहे. कंपनी ऊर्जा कार्यक्षमता व संवर्धन प्रकल्पांना अर्थसाह्य देते. भारतीय रिझर्व्ह बँकेने या कंपनीला ‘इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी’ म्हणून वर्गीकृत केले आहे.

भारत हा जगातील तिसरा सर्वांत मोठा उत्पादक; तसेच उर्जेचा मोठा वापरकर्तादेखील आहे. डिसेंबर २०२३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारताची एकूण स्थापित वीजनिर्मितीक्षमता ४२८ गिगावॉट आहे, ज्यामध्ये नूतनीकरणीय स्रोतांचा वाटा सुमारे ४० टक्के आहे. आगामी काळात नूतनीकरणक्षम ऊर्जाक्षमता वाढविण्यावर भर देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

सध्याची नूतनीकरणक्षम ऊर्जाक्षमता सुमारे १७२ गिगावॉट आहे, जी २०३० पर्यंत ५०० गिगावॉटपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्पांमध्ये दीर्घ कालावधी दिल्याने बँकांची क्षमता मर्यादित होते. अशावेळेस ‘स्पेशलाइज्ड पॉवर फायनान्सर’नी वित्तपुरवठा करण्यात मोठी भूमिका बजावणे अपेक्षित आहे.

जाहीर झालेल्या तिमाही निकालानुसार, सध्या या कंपनीचा निव्वळ नफा ३३७ कोटी रुपयांवर पोचला आहे. वर्षभरात व्यवसायवृद्धी दर्शवत कंपनीचा एकूण निव्वळ नफा १२५२ कोटी रुपयांवर पोचला आहे. आलेखानुसार, या कंपनीच्या शेअरने फेब्रुवारी २०२४ पासून मर्यादित पातळ्यांमधेच चढ-उतार दर्शविला होता.

गेल्या शुक्रवारी या शेअरने २१४ रुपये या पातळीच्या वर २२८ रुपयांवर बंद भाव देऊन मध्यम अवधीसाठी तेजीचे संकेत दिले आहेत. आगामी काळातील व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेता, या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घावधीच्यादृष्टीने मर्यादित प्रमाणात गुंतवणूक करण्याचा विचार करायला हरकत नाही.

(डिस्क्लेमरः या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com