
Indian stock market opens strong as Sensex surpasses 81,430 and Nifty 50 approaches 24,970, driven by US-India trade optimism.
esakal
सेन्सेक्स 81,430 आणि निफ्टी 24,970 वर पोहोचले – भारत-अमेरिका व्यापार चर्चांमुळे शेअर बाजारात मोठी तेजी दिसली.
कापड कंपन्यांचे शेअर्स उसळले – वेल्सपन, गोकलदास एक्सपोर्ट्स, ट्रायडंट, पर्ल ग्लोबल यांसारख्या शेअर्समध्ये ४%–९% वाढ झाली.
व्यापार कराराची आशा गुंतवणूकदारांना दिलासा देते – ट्रम्प-मोदी चर्चेच्या अपेक्षेने निर्यात क्षेत्र आणि रोजगाराला नवीन आशा मिळाली.
Indian Stock Market: भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज हिरव्या रंगात झाली आहे. सेन्सेक्स ने ओलांडला 81,430 चा टप्पा, निफ्टीतही मोठी वाढ असून निफ्टी 50 24,970 वर पोहोचला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर सांगितले की अमेरिका आणि भारतामध्ये 'व्यापार अडथळे' कमी करण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यांनी असेही म्हटले की ते लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींशी या विषयावर चर्चा करू इच्छितात. गिफ्ट निफ्टी फ्युचर्स ५२ अंकांनी वाढून २५,००२ वर व्यवहार करताना दिसले, जे २०१५ नंतरचे सर्वोच्च पातळी आहे.