भारताच्या ऑटो मार्केटमध्ये पेट्रोल, डिझेलचे वर्चस्व, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये मोठी घसरण, काय आहे आकडेवारी?

India's Auto Market: डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
 India's Auto Market Dominated by Petrol, Diesel, Big Decline in Electric Vehicles
India's Auto Market Dominated by Petrol, Diesel, Big Decline in Electric Vehicles Sakal

India's Auto Market: डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी SIYAM (सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स) च्या 63 व्या वार्षिक परिषदेत डिझेल वाहनांवर अतिरिक्त 10 टक्के GST लादण्याबाबत वक्तव्य केले होते. मात्र, सरकारकडे सध्या असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे त्यांनी नंतर सांगितले.

मंगळवारी अनेक ऑटो कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. टाटा मोटर्सपासून ते महिंद्रा अँड महिंद्रापर्यंत मोठे नुकसान झाले. यामागील कारण म्हणजे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले वक्तव्य.

ज्यामध्ये डिझेल इंजिन वाहनांवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटी लावण्यात येणार असल्याचे म्हटले होते. मात्र, नितीन गडकरी यांनी नंतर स्पष्टीकरण दिले की, सध्या सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव नाही, मात्र यादरम्यान ऑटो कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

भारताच्या ऑटो मार्केटची स्थिती

चीन आणि अमेरिकेनंतर जगातील सर्वात मोठ्या भारताच्या ऑटोमोटिव्ह मार्केटबद्दल काही माहिती जाणून घेऊयात. भारतात अनेक मोठ्या कंपन्या आहेत जसे की, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, मर्सिडीज आणि फॉक्सवॅगन. या कंपन्यांनी भारतीय ऑटो मार्केटमध्ये वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या आकडेवारीनुसार मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात भारतात सुमारे चार दशलक्ष प्रवासी वाहने विकली गेली आहेत.

अलिकडच्या वर्षांत पेट्रोल वाहनांची सर्वाधिक विक्री झाली आहेत. त्यांचा मार्केटमधील हिस्सा जानेवारी-जुलै 2023 मध्ये सुमारे 68.4% होता. 2014 मध्ये हा हिस्सा 42.5% होता. असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

 India's Auto Market Dominated by Petrol, Diesel, Big Decline in Electric Vehicles
RBI Order: बँकांच्या कर्जाबाबत RBIचा मोठा निर्णय, ग्राहकांना होणार मोठा फायदा

भारतातील डिझेलवर चालणाऱ्या लक्झरी कारचा विचार केला तर त्यांच्यात मोठी वाढ झाली आहे. त्यांचा बाजारातील हिस्सा 2021 मध्ये 31% वरून यावर्षी आतापर्यंत 33% पर्यंत वाढला आहे. भारतात अनेक खाजगी टॅक्सी, तसेच अनेक मालवाहतूक करणारे ट्रक अजूनही डिझेलवर चालतात.

वाहन निर्मात्यांमध्ये महिंद्रा अँड महिंद्राकडे डिझेल कारचा बाजारपेठेतील वाटा या वर्षी आतापर्यंत 47% आहे, जो 2021 मध्ये 28% होता. Hyundai चा वाटा 15.4% आहे तर Kia चा वाटा 12.7% आहे.

 India's Auto Market Dominated by Petrol, Diesel, Big Decline in Electric Vehicles
Samhi Hotels IPO: पैसे तयार ठेवा! साम्ही हॉटेलचा IPO 14 सप्टेंबरला होणार खुला, किंमतीसह सर्व माहिती एका क्लिकवर

जानेवारी-जुलैमध्ये भारतातील कार विक्रीत इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वाटा फक्त 2.4% होता, परंतु 2030 पर्यंत तो 30% पर्यंत पोहोचावा अशी सरकारची इच्छा आहे.

भारताच्या नवीन ईव्ही मार्केटमधील सर्वाधिक वाटा टाटा मोटर्सकडे आहे. टेस्ला अनेक आठवड्यांपासून बाजारात प्रवेश करण्याचा विचार करत आहे. पण चार्जिंगच्या पायाभूत सुविधांचा अभाव आणि भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती हे कंपनी समोरील मोठे आव्हान आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com