
ITR Filing: कोविड-19नंतर भारतीय गुंतवणूकदारांचा कल झपाट्याने बदलला आहे. शेअर बाजार, रिअल इस्टेट आणि परदेशी मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या बदलत्या ट्रेंडचा थेट परिणाम आयकर रिटर्न फाइल करणाऱ्या नागरिकांवरही झाला आहे. आता अशा व्यक्तींची संख्या झपाट्याने वाढत आहे.
आता नागरिकांचे उत्पन्न केवळ पगारावर आधारित नसून ते भाड्याच्या उत्पन्नातून, शेअर व प्रॉपर्टीवरील भांडवली नफ्यातून (Capital Gains) किंवा परदेशी मालमत्तांमधून पैसे कमावत आहेत.