

indigo flight
esakal
इंडिगो विमानसेवेच्या देशभरातील उड्डाणांमध्ये शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी मोठा व्यत्यय आला. यामुळे हजारो प्रवासी विमानतळांवर अडकून पडले असून, विमानतळ प्रशासनाला प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे. दिल्ली विमानतळावर सर्वात मोठा फटका बसला असून, मध्यरात्री ११.५९ पर्यंत इंडिगोची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. यामुळे एकट्या दिल्लीत २३५ उड्डाणे प्रभावित झाली. चेन्नई विमानतळावरून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्व उड्डाणे बंद ठेवण्यात आली. बंगळुरूत ५२ आगमन आणि ५० प्रस्थान उड्डाणे रद्द झाली, तर हैदराबादेत दिवसभरात ९२ उड्डाणे रद्द करण्यात आली. गेल्या चार दिवसांत इंडिगोची एक हजाराहून अधिक उड्डाणे रद्द झाली आहेत.