IndusInd Bank : इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये होणार वाढ, नवं टारगेट 2000 रुपयांवर...

शेअर बाजारात सध्या बँकिंग शेअर्समध्ये चांगली वाढ होताना दिसत आहे. यात अनेक सरकारी बँकांचाही समावेश आहे तर खासगी क्षेत्रातील अनेक बँकांच्या शेअर्समध्येही वाढ होत आहे.
IndusInd Bank
IndusInd BankSakal

शेअर बाजारात सध्या बँकिंग शेअर्समध्ये चांगली वाढ होताना दिसत आहे. यात अनेक सरकारी बँकांचाही समावेश आहे तर खासगी क्षेत्रातील अनेक बँकांच्या शेअर्समध्येही वाढ होत आहे. अशात इंडसइंड बँकेच्या (IndusInd Bank) शेअर्समध्ये बऱ्याच काळापासून चढ-उतार होताना दिसत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शेअरवरही दबाव आहे. दरम्यान, ब्रोकरेज हाऊसनेही स्टॉकला बाय (BUY) रेटिंग दिले आहे.

26 एप्रिलला बँकेचे शेअर्स 46.10 रुपयांच्या (3.08%) घसरणीसह 1450 रुपयांवर बंद झाले. यासह, गेल्या 1 महिन्यात स्टॉकने 5.45% नेगिटीव्ह परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत शेअरमध्ये खूप चढ-उतार झाले आहेत. गेल्या 6 महिन्यांत स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 0.60% परतावा दिला आहे.

त्याच वेळी, या वर्षी जानेवारी महिन्यापासून, स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 9% नेगिटीव्ह परतावा दिला आहे. जर आपण एका वर्षाबद्दल बोललो तर, गेल्या एका वर्षात स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 26.67% चा पॉझिटीव्ह परतावा दिला आहे. एनएसईवर शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1694.50 रुपये आहे आणि निचांक 1065.35 रुपये आहे.

ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीज इंडसइंड बँकेच्या शेअर्सवर पॉझिटीव्ह आहे आणि खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. इंडसइंड बँकेने आर्थिक वर्ष 2024 मध्ये INR 23.5 अब्जचा PAT अर्थात प्रॉफीट आफ्टर टॅक्स नोंदवला,

तर RoA 1.9% वर मजबूत राहिला. ब्रोकरेजचा असा विश्वास आहे की इंडसइंड बँक विकास, एनआयएम आणि मालमत्तेची गुणवत्ता ट्रिनिटीमध्ये चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळेच ब्रोकरेजने हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला असून त्यावर 2000 रुपयांचे टारगेट दिले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com