

Inflation Shock: India’s Retail Inflation Rises Again; Ginger, Garlic & Onion Prices Add to the Worry
eSakal
Maharashtra Inflation News: अन्नपदार्थांच्या वाढलेल्या किमतींमुळे जुलैमध्ये सलग सातव्या महिन्यात किरकोळ महागाईचा दर वाढून ४.४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. जूनमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाईचा दर ४.३८ टक्के होता. जुलैमध्ये अन्नधान्य महागाईचा दर ५.५२ टक्क्यांवर पोहोचला; जून महिन्यात हा दर ५.३२ टक्के होता. सलग दुसऱ्या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षित चार टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा महागाई दर अधिक आहे. सरकारने आज ही आकडेवारी जाहीर केली.