
Infosys Layoffs: देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या आयटी कंपनीत कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहे. अंतर्गत मूल्यांकन चाचणीत नापास झालेल्या 195 प्रशिक्षणार्थींना कंपनीने पुन्हा एकदा बाहेरचा रस्ता दाखवला आहे. याआधीही इन्फोसिसने दोनदा मूल्यांकन चाचणीत नापास झालेल्या प्रशिक्षणार्थींना नोकरीवरून काढून टाकले आहे.