Infosys : इन्फोसिसला ७९६९ कोटी नफा; भागधारकांना २८ रुपये लाभांश जाहीर

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसला आर्थिक वर्ष २०२४ मधील चौथ्या तिमाहीत ७९६९ कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा झाला असून, त्यात वार्षिक ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत तो ६१२८ कोटी रुपये होता.
Infosys Q4 Net Profit Jumps 30 percernt to Rs 7969 Crore Declares Rs 28 Dividend per Share
Infosys Q4 Net Profit Jumps 30 percernt to Rs 7969 Crore Declares Rs 28 Dividend per ShareSakal

बंगळूर : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसला आर्थिक वर्ष २०२४ मधील चौथ्या तिमाहीत ७९६९ कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा झाला असून, त्यात वार्षिक ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत तो ६१२८ कोटी रुपये होता.

कंपनीच्या संचालक मंडळाने भागधारकांसाठी प्रति शेअर २० रुपये अंतिम लाभांश आणि आठ रुपये विशेष लाभांश असा एकूण २८ रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख व नवनियुक्त सीएफओ जयेश संघराजका यांनी ही माहिती दिली.

कंपनीचा निव्वळ नफा मार्च २०२४ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात, ८.९ टक्क्यांनी वाढून २६,२३३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये तो २४,०९५ कोटी रुपये होता.

कंपनीचा एकत्रित महसूल वार्षिक १.३ टक्क्यांनी वाढून ३७,९२३ कोटी रुपयांवर गेला असून, मागील वर्षी याच कालावधीत तो ३७,४४१ कोटी रुपये होता. कंपनीला चालू आर्थिक वर्षात स्थिर चलनात एक ते तीन टक्के आणि ऑपरेटिंग मार्जिन २० ते २२ टक्के वाढण्याची अपेक्षा आहे.

या चौथ्या तिमाहीत कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन २०.७ टक्के होते. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ऑपरेशन्समधून वार्षिक उत्पन्न ४.७ टक्क्यांनी वाढून १ लाख ५३ हजार ६७० कोटी रुपये झाले आहे, जे एका वर्षापूर्वी एक लाख ४६ हजार ७६७ कोटी रुपये होते.

आर्थिक वर्ष २०२५ पासून कंपनी अर्ध-वार्षिक लाभांश किंवा शेअर बायबॅक किंवा विशेष लाभांश यांच्या संयोजनाद्वारे पाच वर्षांच्या कालावधीत सुमारे ८५ टक्के विनामूल्य रोख प्रवाह परत करण्याचे धोरण सुरू ठेवण्याची अपेक्षा आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.

‘इन-टेक’च्या खरेदीची घोषणा

कंपनीने ४५ कोटी युरोमध्ये जर्मन कंपनी ‘इन-टेक’च्या खरेदी करण्याची घोषणाही केली आहे. ‘इन-टेक’ कंपनी ई-मोबिलिटी, कनेक्टेड आणि ऑटोनॉमस ड्रायव्हिंग, इलेक्ट्रिक वाहने, ऑफ-रोड वाहने आणि रेल्वेमार्ग उपाययोजना आदी क्षेत्रात काम करते.

ही कंपनी ताब्यात आल्यामुळे जर्मनी, ऑस्ट्रिया, चीन, ब्रिटन आणि भारतातील तिच्या २२००कर्मचाऱ्यांसह सखोल ग्राहक संबंध आणि उद्योग कौशल्य यांचा लाभ होईल. हे अधिग्रहण आर्थिक वर्ष २०२५च्या पहिल्या सहामाहीपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com