Awfis Space Solutions IPO : ऑफीस स्पेस सॉल्युशन्सचा आयपीओ 22 मेपासून खुला होणार, पैसे गुंतवावेत का ?

कंपनीला 598.93 कोटी उभे करायचे आहेत. हा आयपीओ 21 मे रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल
Awfis Space Solutions IPO
Awfis Space Solutions IPO Sakal

कोवर्किंग स्पेस कंपनी ऑफीस स्पेस सॉल्युशन्सचा (Awfis Space Solutions) आयपीओ 22 मे रोजी उघडणार आहे. यासाठी 364-383 रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. बिडिंगसाठी लॉट साइज 39 शेअर्सटची असणार आहे.

कंपनीला 598.93 कोटी उभे करायचे आहेत. हा आयपीओ 21 मे रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल तर 27 मे रोजी इश्यू बंद झाल्यानंतर 30 मे रोजी बीएसई आणि एनएसईवर शेअर्स लिस्ट होतील. कंपनी डिसेंबर 2014 मध्ये सुरू झाली.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, ऍक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड आणि एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड हे आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत. ऑफीस स्पेस सॉल्युशन्स वैयक्तिक डेस्कच्या गरजा, स्टार्टअप, एसएमई आणि मोठ्या कंपन्यांसह विविध संस्थांसाठी कस्टमाइज्ड ऑफिसेज तयार करणारी वैविध्यपूर्ण वर्कस्पेस सोल्यूशन्स ऑफर करते.

ऑफीस स्पेस सॉल्युशन्स आयपीओमध्ये 128 कोटीचे 33 लाख नवीन शेअर्स जारी केले जातील. 470.93 कोटीच्या 1.23 कोटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर असेल. कंपनीचे प्रमोटर अमित रमाणी आहेत. रमाणी यांच्याकडे कंपनीमध्ये 18.19 टक्के हिस्सा आहे.

अनुभवी व्हेंचर कॅपिटल फर्म पीक एक्स व्ही पार्टनर्स इन्व्हेस्टमेंट्स व्ही कडे 22.86 टक्के, चिर्स कॅपिटल युनिट बिस्ककडे 23.47 टक्के, क्यूआरजी इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्सकडे 9.58 टक्के, व्हीबीएपी होल्डिंग्सकडे 9.35 टक्के आणि दिग्गज गुंतवणूकदार काहोलियाकडे 50 टक्के हिस्सा आहे.

कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 80 रुपये किंवा 20.89 टक्के प्रीमियमने 383 रुपयांच्या अप्पर प्राइस बँडवर ट्रेड करत आहेत. ग्रे मार्केट हा एक अनधिकृत बाजार आहे जिथे कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात लिस्ट होईपर्यंत ट्रेड करतात.

ऑफीस स्पेस सॉल्युशन्स आयपीओमध्ये, 75 टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, 10 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि 15 टक्के गैर-संस्थागत गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत.

कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 2 कोटींपर्यंतचे शेअर्स राखून ठेवले आहेत. ऑफीस स्पेस सॉल्युशन्सचा महसूल एप्रिल-डिसेंबर 2023 या कालावधीत 633.69 कोटी होता. तर निव्वळ नफा 18.94 कोटी नोंदवला होता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com