
Israel-Iran Crisis: इस्रायल आणि हमास यांच्यातील सुरू असलेले युद्ध आता इराणपर्यंत पोहोचले आहे. इस्रायलने तेहरानवर क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर, मध्य पूर्वेतील तणाव वाढला आहे. त्याचा परिणाम जागतिक स्तरावर तेलाच्या किमतींवरही दिसून येत आहे. अवघ्या दोन दिवसांत, ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 10 डॉलरने वाढून 75 डॉलरवर पोहोचली. भारत 85% तेल आयात करतो, त्यामुळे या युद्धाचा सर्वात जास्त फटका भारताला बसणार आहे.