

TR Deadline 2026: Miss This Date and Pay a ₹5,000 Penalty!
eSakal
Income Tax Alert: आर्थिक वर्ष 2025-26 (असेसमेंट वर्ष 2026-27) साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पगारदार व्यक्तींपासून ते व्यावसायिक मालकांपर्यंत, प्रत्येकाने आपले आयकर रिटर्न विहित वेळेत दाखल करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही वेळेत ITR भरला नाही तर तुम्हाला 5,000 रुपायांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो तसेच तुमच्या रिटर्नदेखील लांबू शकतो. त्यातच यावर्षी, कर विभागाने नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे, ज्यामुळे काही करदात्यांना दिलासा मिळाला आहे.