
Jill Biden Gift: अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या कुटुंबाला 2023 मध्ये जगभरातील नेत्यांकडून लाखो डॉलर्सच्या भेटवस्तू मिळाल्या, त्यापैकी सर्वात मौल्यवान भेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडन यांच्या पत्नी जिल बायडन यांना दिली होती. जिल बायडन यांना पंतप्रधान मोदींनी 20 हजार अमेरिकन डॉलर्स (अंदाजे रुपये 17,15,440) चा हिरा भेट म्हणून दिला होता.