JK Cement's strong results net profit up 67 percent to Rs 184 82 cr
JK Cement's strong results net profit up 67 percent to Rs 184 82 crSakal

J.K. Cement Ltd : जेके सिमेंटचे दमदार निकाल, नेट प्रॉफीट 67% वाढून 184.82 कोटीवर...

जेके सिमेंटने आपल्या गुंतवणुकदारांना कायमच चांगला परतावा दिला आहे. जेके सिमेंटने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे निकाल शनिवारी अर्थात 20 जुलैला प्रसिद्ध केले.
Published on

जेके सिमेंटने आपल्या गुंतवणुकदारांना कायमच चांगला परतावा दिला आहे. जेके सिमेंटने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे निकाल शनिवारी अर्थात 20 जुलैला प्रसिद्ध केले. जून तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा 67 टक्क्यांनी वाढून 184.82 कोटी झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 110.73 कोटी होता असे कंपनीने सांगितले.

या कालावधीत कंपनीचा महसूल 1.62 टक्क्यांनी वाढून 2,807.57 कोटी झाला आहे, जो मागील वर्षी याच तिमाहीत 2,762.63 कोटी होता. जून तिमाहीत जेके सिमेंटचा एकूण खर्च 0.89 टक्क्यांनी घसरून 2,579.14 कोटी झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 2,602.32 कोटी होता. जून तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 2.07 टक्क्यांनी वाढून 2,852.31 कोटी झाले आहे.

कंपनीने प्रयागराजच्या सिमेंट ग्राइंडिंग युनिटमध्ये व्यावसायिक उत्पादन सुरू झाल्याचे जेके सिमेंटने नुकतेच सांगितले. या सिमेंट ग्राइंडिंग युनिटची क्षमता वार्षिक 20 लाख टन आहे असेही त्यांनी सांगितले. हे युनिट यशस्वीरित्या सुरू झाल्यानंतर, जेके सिमेंटची एकूण ग्रे सिमेंट स्थापित क्षमता दरवर्षी 24.34 कोटी टन इतकी वाढली आहे.

यामुळे मार्च तिमाहीत जेके सिमेंटचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 105 टक्क्यांनी वाढून 220 कोटी झाला आहे. त्याच वेळी, त्याचा महसूल वार्षिक आधारावर 12 टक्क्यांनी वाढून 3,106 कोटी झाला आहे. मार्च तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री 11 टक्क्यांनी वाढून 3,017 कोटी झाली आहे.

शुक्रवारी एनएसईवर जेके सिमेंटचे शेअर्स 1.50 टक्क्यांनी घसरून 4,307.15 रुपयांवर बंद झाले. या वर्षाच्या सुरुवातीपासून कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 12.54 टक्के वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 34.14 टक्के परतावा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com