Kunal Kamra vs Bhavish AggarwalSakal
Personal Finance
Ola Electric: कुणाल कामरा आणि ओलाचे सीईओ यांच्यातील वाद वाढला; 'ते' ट्वीट पडलं महागात, कंपनीचे शेअर्स कोसळले
Kunal Kamra vs Bhavish Aggarwal: सध्या ओला इलेक्ट्रिक अनेक समस्यांचा सामना करत आहे. कंपनीविरुद्ध ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत आणि ओलाच्या शेअर्समध्येही मोठी घसरण होत आहे. आता ओला आणि त्याचे सीईओ भाविश अग्रवाल सोशल मीडियावरही अडचणीत आले आहेत.
Kunal Kamra vs Bhavish Aggarwal: सध्या ओला इलेक्ट्रिक अनेक समस्यांचा सामना करत आहे. कंपनीविरुद्ध ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत आणि ओलाच्या शेअर्समध्येही मोठी घसरण होत आहे. आता ओला आणि त्याचे सीईओ भाविश अग्रवाल सोशल मीडियावरही अडचणीत आले आहेत. अलीकडेच कॉमेडियन कुणाल कामरा आणि भाविश अग्रवाल यांच्यात जोरदार वाद झाला. आता कुणाल कामराने पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला आहे.